आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! ५ लाखांचा मेडिक्लेम घेण झाल अधिक सोप; वय वंदना कार्ड आता मोबाईलवरच Ayushman Bharat Vay Vandana Card

2 Min Read
Ayushman Bharat Vay Vandana Card Mobile Update

Ayushman Bharat Vay Vandana Card Mobile Update : आता ७० वर्षांवरील नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण अधिक सुलभ होणार आहे. केंद्र सरकारने “वय वंदना कार्ड” हे थेट मोबाइल अ‍ॅपवर उपलब्ध करून दिल आहे, ज्यामुळ ५ लाखांपर्यंतचा मेडिक्लेम मोफत उपचारासाठी सहज अर्ज करता येणार आहे.

केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत लाखो ज्येष्ठ नागरिकांना मोफत आणि कॅशलेस उपचार मिळतात. मात्र यासाठी आवश्यक असणारे वय वंदना कार्ड मिळवण्याची प्रक्रिया आधी थोडी क्लिष्ट होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नव्या डिजिटल सुविधेची घोषणा केली आहे.

काय आहे हे “आयुष्मान वय वंदना कार्ड”?

७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी खास: यामार्फत ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना दरवर्षी ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो.
मोबाईल अ‍ॅपवरून मिळणार कार्ड: आता हे कार्ड मिळवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. ‘आयुष्मान भारत अ‍ॅप’ वरून थेट अर्ज करून कार्ड मिळवता येईल.
कॅशलेस सुविधा: देशभरातील सरकारी तसेच सूचीबद्ध खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार मिळतात.

वय वंदना कार्ड कस मिळवाल?

  1. मोबाइलमध्ये ‘आयुष्मान भारत अ‍ॅप’ डाऊनलोड करा.
  2. मोबाईल नंबर, कॅप्चा आणि OTP टाकून लॉग इन करा.
  3. लोकेशन आणि आधारसंबंधी माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
  4. कुटुंबातील सदस्यांची माहिती भरून सबमिट करा.

या प्रक्रियेनंतर कार्ड थेट अ‍ॅपमध्ये डाउनलोड साठी उपलब्ध होईल आणि रुग्णालयात दाखल होताना त्याचा वापर करून लाभ घेता येईल. यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क घेतले जाणार नाही.

🔴 हेही वाचा 👉 EPFO 3.0 लवकरच सुरू! आता थेट ATM मधून काढा पीएफ चे पैसे, क्लेम प्रोसेस चुटकीसरशी.

Share This Article