EPFO ATM सुविधा लवकरच सुरू; PF पैसे काढा आता थेट एटीएममधून

2 Min Read
EPFO Atm Card Launch Pf Withdrawal Process

EPFO Atm Card Launch Pf Withdrawal Process : कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलत असून, EPFO 3.0 या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरूवात याच महिन्यात होणार आहे. या माध्यमातून सदस्यांना आपल्या पीएफ खात्यातील रक्कम थेट एटीएममधून काढता येणार असून, कागदी प्रक्रिया पूर्णतः बंद करण्यात येणार आहे.

एटीएम कार्डद्वारे पीएफ रक्कम काढता येणार

EPFO आपल्या सदस्यांसाठी लवकरच एक विशेष एटीएम कार्ड जारी करणार आहे. या कार्डाच्या साहाय्याने सदस्य एटीएममध्ये जाऊन आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतील. सुरुवातीला, खातेदारांना जमा रकमेच्या ५०% पर्यंत पैसे काढण्याची मुभा दिली जाईल. भविष्यात ही मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे.

नव्या EPFO 3.0 प्लॅटफॉर्मचे वैशिष्ट्य

या नव्या EPFO 3.0 प्लॅटफॉर्मअंतर्गत अनेक आधुनिक सुविधा मिळणार आहेत. यामध्ये ऑटो-क्लेम सेटलमेंटचा समावेश असून, क्लेम प्रक्रिया पूर्णतः डिजिटल केली जाईल. म्हणजेच, ऑनलाइन क्लेम केल्यानंतर प्रणाली आपोआप तो प्रोसेस करेल आणि ठरलेल्या कालावधीत रक्कम थेट खात्यात जमा केली जाईल.

बँक ट्रान्सफर व बॅलन्स तपासणी सहज शक्य

या नव्या प्रणालीमुळे सदस्य आपल्या पीएफ खात्याचा बॅलन्स एटीएमवरच तपासू शकतील. त्याचबरोबर, इच्छेनुसार कोणत्याही बँक खात्यात रक्कम ट्रान्सफरही करता येईल. या उपक्रमामुळे 10-15 दिवस लागणारी पारंपरिक प्रक्रिया आता केवळ काही मिनिटांत पार पडेल.

सदस्यांना जलद, पारदर्शक आणि पेपरलेस सेवा देणे हा सरकारचा या नव्या प्रणालीमागील उद्देश आहे.

हेही वाचा : खाद्यतेलाचे दर कमी होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.

Share This Article