Online Aadhaar Apply Process : भारतात आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र मानले जाते. बँक खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारची गरज पडते. अनेकांना वाटते की आधार कार्ड बनवण्यासाठी आधार सेवा केंद्रावर जावे लागते आणि तिथे रांगेत थांबावे लागते, पण आता ही गरज उरलेली नाही. UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने एक सोपी आणि ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामुळे नागरिक घरबसल्या आधार कार्डासाठी अर्ज करू शकतात.
कशी कराल घरबसल्या आधार नोंदणी?
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करू शकता. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरूनच आधारसाठी अपॉइंटमेंट बुक करू शकता:
- UIDAI ची वेबसाइट https://uidai.gov.in उघडा.
- ‘My Aadhaar’ विभागात ‘Book an Appointment’ या पर्यायावर क्लिक करा.
- शहर आणि जवळचे आधार सेवा केंद्र निवडा.
- ‘New Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा.
- आधारसाठी लागणारी कागदपत्रांची माहिती भरा.
- OTP वेरिफिकेशननंतर तुम्ही अपॉइंटमेंटची तारीख आणि वेळ निवडू शकता.
सेवा केंद्रावर काय होते?
अपॉइंटमेंटच्या दिवशी तुम्हाला आधार सेवा केंद्रावर जावे लागेल, जिथे पुढील बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण केली जाते:
तुमचे फिंगरप्रिंट घेतले जातील
डोळ्यांची (Iris) स्कॅनिंग होईल
नवीन फोटो काढला जाईल
कागदपत्रांची पडताळणी केली जाईल
यानंतर तुम्हाला एक एनरोलमेंट स्लिप मिळते, ज्यात आधार स्टेटस ट्रॅक करण्यासाठी एक संदर्भ क्रमांक (Enrollment ID) दिला जातो.
किती दिवसात मिळते नवीन आधार कार्ड?
सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणतः 15 ते 30 दिवसांत तुमचे आधार कार्ड तयार होते. तुम्ही ते UIDAI च्या वेबसाइटवरून PDF स्वरूपात डाऊनलोड करू शकता किंवा पोस्टाने फिजिकल कॉपी मागवू शकता.
फी किती लागते?
नवीन आधार बनवणे पूर्णपणे मोफत आहे. परंतु, जर तुम्ही आधारमध्ये पत्ता किंवा मोबाईल नंबर अपडेट करत असाल, तर ₹50 ते ₹100 शुल्क लागते.
महत्त्वाचे: नवीन आधार बनवण्याची ही प्रक्रिया फक्त पहिल्यांदाच आधार काढणाऱ्यांसाठी आहे. अपडेट साठी वेगळी प्रक्रिया आहे.
🔴 हेही वाचा 👉 दररोज ₹500 देणारी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना; पात्रता, लाभ आणि अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.