नवी दिल्ली | 1 जून 2025: MeitY Internship 2025 Apply Online — तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी समोर आली आहे. भारत सरकारच्या एका महत्वाच्या मंत्रालयाकडून इंटर्नशिपची घोषणा करण्यात आली असून, त्यात सहभागी विद्यार्थ्यांना दरमहा २०,००० रुपयांच मानधन दिल जाणार आहे. ही संधी कोणासाठी आहे? अर्ज कधीपर्यंत करता येईल? आणि निवड कशी होणार? याची सविस्तर माहिती जाणून घ्या…
MeitY Internship 2025
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) जुलै २०२५ सत्रासाठी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाच्या (NeGD) अंतर्गत तांत्रिक इंटर्नशिप योजनेची घोषणा केली आहे. ही इंटर्नशिप ६ महिन्यांची असून ती ऑफलाइन स्वरूपात, म्हणजेच प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहून केली जाईल.
कोण करू शकतो अर्ज?
या इंटर्नशिपसाठी इंजिनीअरिंग पदवीधर, पदव्युत्तर किंवा समकक्ष शिक्षण घेतलेले उमेदवार अर्ज करू शकतात. पात्रतेसाठी किमान ७५% गुण आवश्यक आहेत. २०२४, २०२५ मध्ये पदवी घेतलेले किंवा २०२६ मध्ये अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी अर्जासाठी पात्र आहेत.
वेतन आणि प्रमाणपत्र
या इंटर्नशिपमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २०,००० रुपये स्टायपेंड दिला जाईल. तसेच इंटर्नशिप यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर NeGD कडून अधिकृत प्रमाणपत्र दिल जाईल.
जुलै २०२५ मध्ये एकूण ५० पदे उपलब्ध असून, खालील क्षेत्रांमध्ये संधी आहेत:
Java / PHP / Python / NodeJS / Dotnet Developer – 6 पदे
UI-UX / Frontend Developer – 6 पदे
Software Testing / QA – 11 पदे
Database Programmer – 6 पदे
Business Analyst – 6 पदे
Data Engineering & Analytics – 5 पदे
AI / ML / IoT – 5 पदे
DevOps & Automation – 5 पदे
निवड कशी होईल?
उमेदवारांची निवड त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, प्रमाणपत्रे, आणि महाविद्यालयाच्या NIRF रँकिंग यावर आधारित असेल. अंतिम निवड ही NeGD च्या अंतर्गत मानव संसाधन व प्रकल्प विभागाच्या समितीमार्फत केली जाईल.
अर्जाची अंतिम तारीख – १५ जून २०२५
MeitY Internship 2025 Apply Online : इच्छुक उमेदवारांनी negd.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून 2025 आहे.
हेही वाचा : RBI ची मोठी घोषणा: ‘या’ 3 नोटा बंद! 500 रुपयांची नोट ठरली सर्वाधिक वापरली जाणारी.