Post Office Monthly Income Scheme MIS Benefits Interest Return : फक्त एकदाच पैसे गुंतवून तुम्ही दरमहा स्थिर उत्पन्न मिळवू शकता का? होय! केंद्र सरकारच्या एका लोकप्रिय पोस्ट ऑफिस स्कीममधून तुम्ही दरवर्षी ₹1 लाखांहून अधिक कमवू शकता, तेही कोणतीही जोखीम न घेता.
पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम (MIS) ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारी बचत योजना आहे. या योजनेमध्ये एकदाच गुंतवणूक करून तुम्ही दरमहा ठराविक व्याजाच्या स्वरूपात स्थिर उत्पन्न मिळवू शकता. ही योजना विशेषतः निवृत्त नागरिक, गृहिणी आणि नियमित उत्पन्नाच्या शोधात असलेल्यांसाठी फायदेशीर आहे.
या योजनेतून किती मिळेल उत्पन्न?
ज्वाइंट अकाउंटसाठी (Joint Account):
जर या योजनेत ज्वाइंट अकाउंट उघडून 15 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला दरमहा ₹9,250 म्हणजेच दरवर्षी 1.11 लाख रुपये मिळतात.
सिंगल अकाउंटसाठी (Single Account):
जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत 9 लाख रुपये गुंतवले, तर त्याला दरमहा ₹5,550 आणि दरवर्षी 66,660 रुपये इतका नफा मिळतो.
सध्या या योजनेचा वार्षिक 7.4% इतका व्याजदर आहे, जो दरमहा दिला जातो. गुंतवणुकीसाठी किमान रक्कम ₹1,000 असून, ही योजना 5 वर्षांसाठी असते. नंतर हवी असल्यास ती पुढे वाढवता येते.
या योजनेचे फायदे:
केंद्र सरकारची योजना असल्याने 100% सुरक्षितता
TDS लागू नाही (मात्र व्याजावर कर लागू शकतो)
एकाहून अधिक MIS अकाउंट्स उघडता येतात
ब्रांच बदलण्याची सुविधा उपलब्ध
अकाउंट वेळेपूर्वी बंद केल्यास काही अटींसह पैसे परत
पैसे वेळेपूर्वी काढायचे असल्यास:
1 वर्षाआधी पैसे काढता येत नाहीत
1 ते 3 वर्षांत खाते बंद केल्यास – 2% दंड
3 ते 5 वर्षांत बंद केल्यास – 1% दंड
🔴 हेही वाचा 👉 मान्सूनपूर्वी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा! जाणून घ्या सविस्तर….