EPFO 3 Launch Atm Withdrawal Auto Claim Settlement : कर्मचारी भविष्य निधी (EPFO) खातेदारांसाठी एक मोठी सुधारणा लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. EPFO 3.0 हा नविन डिजिटल प्लॅटफॉर्म येत्या महिनाभरात सुरू होण्याची शक्यता आहे आणि यामुळे 9 कोटीहून अधिक पीएफ सदस्यांना डिजिटल स्वरूपात अधिक वेगवान आणि पारदर्शक सेवा घेण शक्य होणार आहे.
EPFO 3.0 द्वारे आता पीएफ सदस्य थेट ATM मधून पीएफची रक्कम काढू शकतील. क्लेम अप्रूव्ह झाल्यानंतर बँकेत जाण्याची गरज नाही, तर बँकेप्रमाणेच कार्ड स्वाइप करून रक्कम काढता येणार आहे. याशिवाय, क्लेम सेटलमेंट प्रक्रिया पूर्णपणे ऑटोमेटेड होणार असून, यामुळे पूर्वी लागणारा वेळ आणि कागदपत्रांची अडचण दूर होईल.
EPFO 3.0 चे मुख्य फायदे काय असतील?
ATMमधून रक्कम काढणे: क्लेम मंजूर झाल्यावर थेट ATM द्वारे पैसे मिळतील.
ऑटो-क्लेम सेटलमेंट: संपूर्ण प्रक्रिया यंत्रचालित (automated) होणार.
डिजिटल अपडेट सुविधा: खातेधारक स्वतःच ऑनलाईन नाव, जन्मतारीख वगैरे अपडेट करू शकतील.
OTP आधारित पडताळणी: पूर्वीच्या फॉर्म प्रक्रियेऐवजी मोबाइलवर OTP आधारित सिस्टम.
फास्ट तक्रार निवारण प्रणाली: नव्या प्लॅटफॉर्मवर जलद व अचूक तक्रार निवारण शक्य होईल.
सरकारी योजना एकत्रीकरण: अटल पेन्शन योजना, जीवन विमा योजना यांचा समावेश EPFO मध्ये करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ESIC मध्येही मोठा बदल होणार
कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) देखील आता आयुष्मान भारत योजनेशी जोडले जाईल. यामुळे ESIC सदस्यांना देशभरातील सरकारी, खासगी आणि धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणार आहेत. सध्या देशभरात 165 रुग्णालयांचे नेटवर्क कार्यरत आहे आणि सुमारे 18 कोटी लाभार्थ्यांना आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत.
🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना: आधार अपडेट न केल्यास होणार सस्पेंड!.