अकरावी प्रवेश प्रक्रियेत पुन्हा बदल; पहिली गुणवत्ता यादी ‘या’ तारखेला FYJC Admission Delay 2025

1 Min Read
FYJC Admission Delay 2025 Merit List Postponed June 26

मुंबई, ११ जून २०२५ : FYJC Admission Delay 2025 Merit List Postponed June 26 – अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींमुळे १० जून रोजी अपेक्षित असलेली पहिली गुणवत्ता यादी आता २६ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

प्रवेश प्रक्रियेत सुरुवातीपासून अडथळे

यंदा दहावीचा निकाल १५ दिवस आधी – २१ मे रोजी – जाहीर करण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २६ मे पासून सुरु झाली, आणि अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात त्रास झाला.

अखेर ७ जून रोजी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली, आणि १० जून रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. पण, तांत्रिक बिघाड अद्यापही कायम असल्यामुळे प्रवेशाचे वेळापत्रक लांबणीवर टाकण्यात आले आहे.

नव्या वेळापत्रकानुसार महत्त्वाच्या तारखा:

अंतिम गुणवत्ता यादी व शून्य फेरी वाटप: ११ जून
शून्य फेरी प्रवेश: १२ ते १४ जून
पहिली नियमित फेरीचे वाटप: १७ जून
गुणवत्ता यादी जाहीर (Regular Round 1): २६ जून
प्रवेश प्रक्रिया (Round 1): २७ जून ते ३ जुलै
दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी: ५ जुलै

अकरावी प्रवेश प्रक्रियेतील सततच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक नुकसान आणि शैक्षणिक गोंधळ वाढत आहे. सरकारने या प्रक्रियेत तत्काळ सुधारणा करणे गरजेचे आहे.

हेही वाचा : PAN कार्डवरील १० अंकी नंबरचा अर्थ माहिती आहे का? येथे जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Share This Article