Maharashtra Monsoon 2025 Orange Alert Heavy Rain June Forecast : महाराष्ट्रात लवकर दाखल झालेल्या मान्सूननंतर सुरुवातीला समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे वातावरण उष्ण आणि दमट राहिले होते. मात्र, भारतीय हवामान विभागाने (IMD) आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला असून राज्यातील अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 13 जूनपासून (गुरुवार) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पावसाचा जोर वाढणार – IMD चा अंदाज
IMD च्या आकड्यानुसार, 30 जूनपर्यंत महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पहिल्याच आठवड्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता असून नंतर दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात मध्य भारतातही समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जिल्हानिहाय ऑरेंज अलर्ट
हवामान विभागानुसार पुढील प्रमाणे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे:
गुरुवार, 13 जून:
अकोला
अमरावती
नागपूर
गोंदिया
चंद्रपूर
गडचिरोली
सांगली
कोल्हापूर
शुक्रवार, 14 जून:
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
पुणे
सांगली
सातारा
कोल्हापूर
अकोला
नागपूर
भंडारा
गोंदिया
चंद्रपूर
गडचिरोली
शनिवार, 15 जून:
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
रविवार, 16 जून:
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
पूरजन्य परिस्थितीचा धोका
हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांच्या मते, देशभरात सध्या ३२% कमी पावसाची नोंद आहे. मात्र, जून अखेरीस पावसाचे प्रमाण सरासरीच्या १०८% पर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने काही भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यभरात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह असून, हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे दरड कोसळणे, पूर, वाहतूक अडथळे अशा घटनांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
हेही वाचा : कधी जमा होणार पैसे? आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाहीत?.