सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी संधी! NPS सदस्य आता घेऊ शकणार युनिफाइड पेन्शन योजनेचा लाभ – 30 जूनपर्यंत फक्त करा हे काम Unified Pension Scheme

2 Min Read
Unified Pension Scheme Deadline NPS Subscribers

Unified Pension Scheme Deadline NPS Subscribers : केंद्र सरकारी नोकरीत असलेल्या आणि नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) अंतर्गत सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि अंतिम संधी आहे. आता हे कर्मचारी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) मध्ये सहभागी होऊ शकतात, मात्र यासाठी अंतिम मुदत 30 जून 2025 आहे.

सरकारने काय बदल केला आहे?

1 एप्रिल 2025 पासून लागू होणाऱ्या युनिफाइड पेन्शन योजनेमुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ठराविक मासिक पेन्शन मिळण्याची हमी दिली जाणार आहे. ही योजना NPS योजनेच्या तुलनेत अधिक स्थिरता आणि सुरक्षा देणारी आहे.

NPS सदस्य UPS मध्ये कसे सहभागी होऊ शकतात?

NPS अंतर्गत असलेल्या कर्मचारी किंवा त्यांच्या पेन्शन घेणाऱ्या नॉमिनीला Form B-2, B-4 किंवा B-6 भरून अधिकृत विभागाकडे सादर करावा लागेल.
ही प्रक्रिया www.npscra.net.nsdl.co.in/ups.php वर ऑनलाइनही करता येते.
फॉर्म भरताना कर्मचारी किमान 10 वर्षे सेवा पूर्ण केलेला असावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 30 जून 2025 आहे.

UPS योजनेतुन काय लाभ मिळणार?

किमान 10,000 रुपये मासिक पेन्शन (सेवा वर्षे व पगारानुसार वाढू शकते).
सेवेत असतानाच मृत्यू झाल्यास – कुटुंबीयांना पेन्शनपैकी 60% रक्कम मिळणार.
पूर्वी NPS मध्ये असलेले, पण 31 मार्च 2025 पूर्वी निवृत्त झालेले कर्मचारीही पात्र.

केंद्र सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी युनिफाइड पेन्शन योजना म्हणजे आर्थिक स्थैर्याचा आधार आहे.

🔴 हेही वाचा 👉 आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! ५ लाखांचा मेडिक्लेम घेण झाल अधिक सोप; वय वंदना कार्ड आता मोबाईलवरच.

Share This Article