मान्सूनपूर्वी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा! जाणून घ्या सविस्तर… Kisan Credit Card Limit Increase

1 Min Read
Kisan Credit Card Limit Increase 2025 KCC Loan Scheme Benefits

Kisan Credit Card Limit Increase 2025 KCC Loan Scheme Benefits : मान्सून अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे आणि अशातच केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. पण, सरकार नेमक काय प्लॅन करत आहे? यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो? जाणून घ्या सविस्तर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत किसान क्रेडिट कार्ड (KCC) ची कर्जमर्यादा सध्याच्या ₹5 लाखांवरून वाढवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना 4% व्याजदरात लोन मिळते आणि त्याचा उपयोग पीक कर्ज, जनावरांची खरेदी किंवा मत्स्यव्यवसायासाठीही करता येतो.

1998 मध्ये सुरू झालेली ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे. यामध्ये सिक्युअर्ड आणि अनसिक्युअर्ड प्रकारचे लोन उपलब्ध असून, अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, जमीनीची कागदपत्रे, पासपोर्ट साईझ फोटो या कागदपत्रांची आवश्यकता असते. शेतकरी बँकेच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

जर अर्ज केलेल्या तारखेपासून 15 दिवसांत किसान क्रेडिट कार्ड जारी झाले नाही, तर बँकिंग लोकपाल किंवा आरबीआयच्या CMS पोर्टलवर तक्रार करता येते. त्याचबरोबर हेल्पलाइन नंबर आणि ईमेल सुविधा देखील उपलब्ध आहे.

🔴 हेही वाचा 👉 कृषी विभागाचा मोठा निर्णय! ‘या’ शेतकऱ्यांसाठी 145 कोटींचा निधी मंजूर.

Share This Article