लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीं यादीत होणार मोठा बदल, CBDT ने दिली परवानगी Ladki Bahin Yojana Income Verification

2 Min Read
Ladki Bahin Yojana Income Verification CBDT

Ladki Bahin Yojana Income Verification CBDT : राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी प्राप्त झालेल्या २ कोटींपेक्षा अधिक अर्जांची पडताळणी करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) परवानगी दिली आहे. यामुळे आता उत्पन्नाची अट पूर्ण न करणाऱ्या अर्जदार महिलांचे अर्ज पुन्हा तपासले जाणार आहेत.

मोठ्या प्रमाणात होणार अर्जांची छाननी 

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी राज्यभरातून तब्बल २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹१,५०० आर्थिक मदत दिली जाते. मात्र यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

आर्थिक उत्पन्नाच्या अटीचे पालन न करता काही अर्जदार महिलांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्राप्तिकर खात्याकडून अधिकृत आर्थिक माहिती घेऊन अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

CBDT ने दिली परवानगी

सहा महिन्यांपूर्वी महिला व बालविकास विभागाने प्राप्तिकर खात्याकडे अर्जदारांच्या उत्पन्नाची माहिती मागितली होती. मात्र CBDT च्या मंजुरीशिवाय ही माहिती देता येत नव्हती. आता ही परवानगी मिळाल्यामुळे येत्या काही दिवसात सर्व अर्जांची माहिती तपासली जाणार आहे.

अपात्र अर्जांची संख्या वाढणार?

यापूर्वीच जवळपास ९ लाख अर्ज अपात्र ठरवण्यात आले होते. आता प्राप्तिकर खात्याकडून मिळणाऱ्या माहितीनंतर अजूनही लाखो महिलांचे अर्ज अपात्र ठरू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीं यादीत मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारवर आर्थिक ताण

राज्य सरकार सध्या २ कोटी ५२ लाख महिलांना दरमहा ₹१,५०० अनुदान देत आहे. यासाठी दरमहा ₹३,७०० कोटींचा खर्च केला जात आहे. जर मोठ्या संख्येने अर्ज अपात्र ठरले, तर सरकारवरचा आर्थिक भार काहीसा कमी होऊ शकतो.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल अशी शक्यता आहे.

हेही वाचा : महिलांना व्याजमुक्त कर्ज, अर्ज कसा करावा? जाणून घ्या.

Share This Article