50,000 महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन? महिलांसाठी सुवर्णसंधी! जाणून घ्या काय आहे योजना… Mofat Silai Machine Yojana 2025 Fact Check

2 Min Read
Mofat Silai Machine Yojana 2025 Fact Check Marathi

Mofat Silai Machine Yojana 2025 Fact Check Marathi : महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार! आर्थिक मदत, ट्रेनिंग आणि भत्ता मिळणार! अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल जाली आहे. ‘Free Silai Machine Yojana 2025’ नावाने ही योजना सध्या व्हायरल होत आहे, ज्यात गरीब, विधवा किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना घरबसल्या रोजगार मिळेल असा दावा केला जातोय.

तुम्हालाही तुमच्या वॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये किंवा फेसबुकवर हा मेसेज दिसला असेल – “फॉर्म भरा, ट्रेनिंग घ्या, दररोज 500 रुपये मिळवा, आणि नंतर 2 लाखांचे लोन देखील!” पण… हा संपूर्ण प्रकार खरोखर सरकारी योजना आहे का?

आम्ही केली या योजनेची फॅक्ट चेक तपासणी, आणि सत्य थोड आश्चर्यजनक आहे…

‘Free Silai Machine Yojana 2025’ बाबत सत्य काय आहे?

या योजनेबाबत भारत सरकारच्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटवर – जस कि India.gov.in, PIB, pmindia.gov.in किंवा महिला व बालविकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर – कुठलीही माहिती नाही.

पीआयबी फॅक्ट चेक टीमने देखील अशा पोस्ट्सना बनावट ठरवल आहे. केंद्र सरकारकडून अशा नावाची कोणतीही योजना सुरू करण्यात आलेली नाही.

व्हायरल पोस्टमध्ये केले जाणारे भ्रामक दावे

50,000 महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार
15,000 रुपयांची आर्थिक मदत
500 रुपये ट्रेनिंग भत्ता दररोज
2–3 लाख रुपये पर्यंत लोन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: मार्च 2028

हे सगळे दावे खोटे आहेत. अशा कोणत्याही योजनेची केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्सवर आपली माहिती भरू नका. अनेक बनावट वेबसाइट्स अशा स्कीमच्या नावावर तुमचा आधार क्रमांक, बँक डिटेल्स आणि वैयक्तिक माहिती मागतात.
कोणतीही योजना असल्यास ती gov.in किंवा nic.in या अधिकृत डोमेनवर असते.
कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी शासकीय संकेतस्थळावर योजनेची खात्री करूनच अर्ज करा.

🔴 हेही वाचा 👉 या योजनेत एकदाच गुंतवणूक करा आणि मिळवा दरमहा 9,250 रुपये! जाणून घ्या काय आहे ही योजना.

Share This Article