नवी दिल्ली, ११ जून २०२५ : PM Kisan Yojana 20th Installment Release Date – पिएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती. केंद्र सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरीही, जून महिन्याचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आतापर्यंत १९ हप्ते वितरित
शेतकऱ्यांना दरवर्षी तीन वेळा – चार महिन्यांच्या अंतराने – २,००० रुपयांचा हप्ता दिला जातो. आतापर्यंत एकूण १९ हप्त्यांचा लाभ कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळाला आहे. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी १९वा हप्ता वितरित करण्यात आला होता.
पिएम किसान योजनेचा २०वा हप्ता कधी जमा होणार?
शासकीय वेबसाइट pmkisan.gov.in वर २०व्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृत अपडेट नसली, तरी मागील हप्त्यांच्या वेळापत्रकानुसार चार महिन्यांचे अंतर धरल्यास जूनमध्ये हप्ता येण्याची शक्यता आहे.
हप्ता मिळवायचा असेल तर ‘ही’ ३ कामे आजच पूर्ण करा!
- ई-केवायसी (e-KYC): पिएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे.
- भू-सत्यापन (Land Verification): आपल्या जमिनीची नोंद व पडताळणी आवश्यक.
- आधार लिंकिंग (Aadhaar Linking): आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असावा.
ही कामे पूर्ण नसतील तर तुमच्या खात्यात हप्ता जमा होणार नाही.
शेतकऱ्यांनी काय करावे?
pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या
‘Know Your Status’ किंवा ‘Beneficiary List’ तपासा
कोणतीही अडचण असल्यास स्थानिक कृषी अधिकारी किंवा CSC सेंटरशी संपर्क करा
PM-Kisan योजनेचा २०वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. मात्र लाभ मिळवण्यासाठी वेळेत ई-केवायसी, भू-सत्यापन आणि आधार लिंकिंग पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा तुमचा हप्ता अडकू शकतो.
हेही वाचा : अकरावी प्रवेश प्रक्रियेत पुन्हा बदल; पहिली गुणवत्ता यादी ‘या’ तारखेला.