Aadhaar Card Free Update: आधार कार्ड अजूनही अपडेट केल नाही? मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी गमावू नका!

2 Min Read
Aadhaar Card Free Update Last Date 2025

Aadhaar Card Free Update Last Date 2025 : जर तुमच किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाच आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीच असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. कारण UIDAI ने आधीच स्पष्ट केल आहे की जुन्या आधार कार्डचे दस्तावेज अपडेट करण अनिवार्य आहे. आणि हो – ही प्रक्रिया सध्या विनामूल्य आहे, पण त्यासाठी आता फक्त काहीच दिवस उरले आहेत!

आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२५ आहे. त्यानंतर हे काम मोफत करता येणार नाही. त्यामुळे जर अजूनपर्यंत तुम्ही आधार अपडेट केल नसेल, तर हीच योग्य वेळ आहे.

आधार कार्ड मोफत अपडेट कस करायच?

आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जा – uidai.gov.in. तिथे ‘Update Aadhaar’ पर्याय निवडून, ‘Document Update’ वर क्लिक करा.

नंतर आधार क्रमांक व OTP टाकून लॉगिन करा. नंतर तुमच ओळखपत्र आणि पत्ता पुरावा (उदा. पॅन कार्ड, वोटर आयडी) हे दोन दस्तावेज स्कॅन करून अपलोड करा. हे काम पूर्ण केल्यावर तुम्हाला एक रिक्वेस्ट नंबर मिळेल – ज्याद्वारे तुम्हाला नंतर आधार अपडेटची स्थिती तपासता येते.

महत्त्वाच म्हणजे, हे काम १४ जून २०२५ पर्यंतच मोफत आहे. त्यानंतर तुम्हाला पैसे भरावे लागतील.

म्हणून उशीर न करता आजच तुमच आणि तुमच्या घरातील सदस्यांच आधार अपडेट करा – तेही मोबाईलवरून, विनामूल्य!

हेही वाचा : तुमच्या Aadhaar चा गैरवापर तर होत नाही ना? या दोन सोप्या स्टेप्समध्ये लगेचच तपासा, UIDAI च हे फीचर आहे खूपच उपयुक्त.

Share This Article