तुमच्या Aadhaar चा गैरवापर तर होत नाही ना? या दोन सोप्या स्टेप्समध्ये लगेचच तपासा, UIDAI च हे फीचर आहे खूपच उपयुक्त

2 Min Read
Aadhaar Misuse Check Authentication History

Aadhaar Misuse Check Authentication History : तुमच्याकडे पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, व्होटर आयडी यांसारखे अनेक डॉक्युमेंट्स असतील, पण त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे आधार कार्ड. सरकारी कामांपासून खाजगी व्यवहारांपर्यंत सर्व ठिकाणी याचा वापर होतो. मात्र जर हे कार्ड चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागल, तर त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो आणि त्यामुळे तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता. त्यासाठी वेळीच सावध राहण गरजेच आहे.

सुदैवाने UIDAI (यूआयडीएआय) ने अशी सोय केली आहे, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या दोन मिनिटांत तुमच्या आधारचा इतिहास (Authentication History) तपासू शकता आणि त्याचा गैरवापर होत असल्याच तो तत्काळ थांबवू शकता.

तुमच्या आधारचा गैरवापर होत आहे का कस ओळखाल?

आज अनेक ठिकाणी आपल्याला आधारची माहिती शेअर करावी लागते – सिम कार्ड घेताना, बँकेत खाते उघडताना, किंवा सरकारी योजनांमध्ये अर्ज करताना. या सगळ्या ठिकाणी धोका असतो की तुमच्या आधारचा वापर करून कुणीही चुकीचा व्यवहार करू शकतो. त्यामुळे UIDAI ने दिलेल्या फीचरचा वापर करून, तुमच आधार नेमक कुठ वापरल गेल आहे याची सविस्तर माहिती तुम्ही मिळवू शकता.

तुमच्या आधारचा गैरवापर झाला आहे का, हे जाणून घेण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसेस:

स्टेप 1:

https://myaadhaar.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
‘Login’ वर क्लिक करा.
आधार नंबर व कॅप्चा टाका, नंतर ओटीपी भरून लॉगिन करा.

स्टेप 2:

लॉगिन झाल्यावर ‘Authentication History’ पर्याय निवडा.
येथे आधार कधी, कुठे आणि कशासाठी वापरल गेल आहे याची संपूर्ण माहिती मिळते.

गैरवापर झाल्याचे आढळल्यास काय करावे?

जर काही संशयास्पद हालचाल आढळली, तर तुम्ही तात्काळ खालील गोष्टी करा:

आधारचा बायोमेट्रिक लॉक करा. यामुळे तुमचा फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅन कुणीही वापरू शकत नाही.
UIDAI च्या हेल्पलाईन नंबर 1947 वर कॉल करून तक्रार नोंदवा.

हेही वाचा : आयुष्मान कार्डसंदर्भात महत्त्वाची माहिती; पात्रतेपासून कार्ड डाऊनलोडपर्यंतची प्रक्रिया जाणून घ्या.

Share This Article