NPS VS UPS Central Government Pension Benefits : केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत सेवेत असणाऱ्या किंवा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, ३१ मार्च २०२५ पर्यंत किमान १० वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकीकृत पेन्शन योजना (UPS) चा पर्याय निवडता येणार असून, यामुळे त्यांना एनपीएस शिवायही अतिरिक्त फायदे मिळणार आहेत.
आता या कर्मचाऱ्यांना, किंवा त्यांच्या जीवनसाथ्याला, एनपीएसमधून मिळणाऱ्या पेन्शनसह यूपीएसअंतर्गत देखील लाभ घेता येईल. विशेष म्हणजे हा एकवेळचा आर्थिक लाभ त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 10% दराने, प्रत्येक पूर्ण 6 महिन्यांच्या सेवेसाठी दिला जाईल. त्याशिवाय, एनपीएसमधून मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेपासून यूपीएसद्वारे मिळणाऱ्या पेन्शन व महागाई भत्त्याचा फरक तपासून त्यानुसार मासिक टॉप-अप दिला जाईल.
पेंशनवर व्याजही मिळणार!
या निर्णयानुसार, संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना PPF व्याजदरांप्रमाणे साधा व्याजदर देखील दिला जाईल. म्हणजेच फक्त पेंशनच नव्हे, तर जमा रकमेवर व्याजाचाही लाभ मिळणार आहे.
UPS साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख:
यूपीएसचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२५ निश्चित करण्यात आली आहे. यासाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यूपीएस कोणासाठी लागू आहे?
यूपीएस योजना सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे, जे १ जानेवारी २००४ नंतर NPSमध्ये सहभागी झाले आहेत आणि ज्यांनी NPS ऐवजी यूपीएस निवडण्याचा पर्याय निवडला आहे. या नव्या निर्णयामुळे जवळपास २३ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना NPS व UPS यामध्ये निवडीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या आणि NPSमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक सुरक्षित आणि नियमित उत्पन्नाची हमी मिळणार आहे. पगाराच्या ५०% इतकी पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता हा निश्चित लाभ कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा आहे.
हेही वाचा : या सरकारी योजनेत ₹12,500 गुंतवा आणि बना करोडपती – पैशांची 100% सुरक्षा.