11th Admission Portal: अकरावी प्रवेश प्रक्रिया ठप्प: पोर्टल बंद, विद्यार्थ्यांमध्ये नाराजी; शिक्षण विभागाच्या व्यवस्थेवर सवाल

2 Min Read
11th Admission Portal Closed Complaints 2025

11th Admission Portal Closed Complaints 2025 : राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया (२१ मे २०२५) पासून सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू होण्याआधीच प्रवेश पोर्टल बंद असल्याने राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.


राज्यातील अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थी शहर आणि ग्रामीण भागातून अकरावी प्रवेशासाठी तयारीत होते. मात्र, तांत्रिक कारणामुळे पोर्टल बंद झाल्याने त्यांना प्रवेश अर्ज सादर करता आलेले नाही. यामुळे अनेकांची उन्हाळी सुट्टी प्रवेश प्रक्रियेतच संपणार असल्याचे चित्र आहे. शिक्षण विभागाच्या नियोजनावर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


शिक्षण संचालनालयाने दिले स्पष्टीकरण


पोर्टल बंद राहण्यामागील कारण स्पष्ट करताना शिक्षण संचालनालय, पुणे यांनी सांगितले की, मोबाइलवर पोर्टल अधिक सुलभपणे वापरता यावे यासाठी सुधारणा सुरू आहे, त्यामुळे काही काळासाठी पोर्टल तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे.


प्रवेशासाठी अंतिम तारीख


विद्यार्थ्यांना दिलासा देत, शिक्षण विभागाने स्पष्ट केल आहे की नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया २८ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चिंता करण्याचे कारण नाही, असही त्यांनी सांगितलं आहे.


अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेल सुरू


प्रवेश प्रक्रियेतील सर्व अपडेट्ससाठी शिक्षण संचालनालयाने अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेल सुरू केल आहे. विद्यार्थ्यांनी या चॅनेलवर जाऊन माहिती मिळवावी, अस आवाहनही करण्यात आल आहे.

🔴 हेही वाचा 👉 मध्ये मोफत गॅस सिलेंडरसाठी अर्ज करताय? ‘ही’ कागदपत्रे नसतील तर मिळणार नाही लाभ!.

Share This Article