Maharashtra SSC Result 2025 Date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) 10वीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 2025 साली घेण्यात आलेल्या SSC परीक्षेत सहभाग घेतला होता, ते mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहू शकतात.
बोर्डाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा लवकरच होणार असून, निकाल mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. निकाल जाहीर करताना आयोजित करण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत यंदाच्या परीक्षेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या, उत्तीर्ण टक्केवारी, व विभागनिहाय निकाल यांचा तपशील दिला जाईल.
10 विचा निकाल कसा तपासायचा?
- mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जा
- “Maharashtra SSC Result 2025” या लिंकवर क्लिक करा
- लॉगिन माहिती (जसे की सीट नंबर) भरा
- सबमिट केल्यावर स्क्रीनवर निकाल दिसेल
- निकाल डाउनलोड करून प्रिंट घेऊन ठेवा
यंदाची SSC परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आली होती. परीक्षा दोन सत्रांमध्ये—पहिल सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुसर दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत पार पडली होती.
मागील वर्षाच्या निकालाबद्दल
2024 मध्ये SSC चा निकाल 27 मे रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी 15.60 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यापैकी 15.49 लाख विध्यार्थ्यानी परीक्षा दिली होती. तर, 95.81% विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 97.21% आणि मुलांची 94.56% होती. कोकण विभागाने 99.01% निकालासह सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती, तर नागपूर विभागात सर्वात कमी म्हणजेच 94.73% निकाल लागला होता.
🔴 हेही वाचा 👉 घरबसल्या मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, आता RTOला भेट न देता होणार सगळ काम ऑनलाइन.