Free Silai Machine Yojana 2025 Fact Check : महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबवल्या जातात. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यात (Mofat Silai Machine Yojana) ‘मोफत शिलाई मशीन योजना 2025’च्या नावाने महिलांना मोफत मशीन, ट्रेनिंग आणि ₹15,000 पर्यंत आर्थिक मदतीच आश्वासन दिल जात आहे. या योजनेनुसार 21 ते 40 वयोगटातील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना घरबसल्या रोजगार सुरू करण्याची संधी मिळणार आहे, अस सांगितल जात आहे. अर्जाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून, फॉर्म सबमिट करताच लाभ मिळणार, असा दावा केला जातोय.
व्हायरल पोस्टमध्ये लाभाच्या नावाने अनेक आकर्षक गोष्टी सांगितल्या जात आहेत — जस की शिलाई मशीनसोबत व्यावसायिक ट्रेनिंग, प्रमाणपत्र, किट्स, आणि काम सुरू करण्यासाठी अतिरिक्त रक्कम दिली जाईल. काही व्हायरल मेसेजेसमध्ये ‘पीएम विश्वकर्मा योजने’शीही या योजनेचा संबंध जोडला जातो. त्यामुळे अनेक महिला या योजनेसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Free Silai Machine Yojana | या सर्व दाव्यांच सत्य काय आहे?
फॅक्ट चेक केल्यावर लक्षात येत की, ‘मोफत शिलाई मशीन योजना 2025’ या नावाची केंद्र सरकारकडून कोणतीही योजना अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही. सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या किंवा पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर अशा कोणत्याही योजनेचा उल्लेख नाही.
खर म्हणजे, अशा योजना दर काही महिन्यांनी नव्या नावाने सोशल मीडियावर पुन्हा-पुन्हा व्हायरल होतात. त्या पोस्ट्समध्ये खोट्या वेबसाइट्सचे लिंक्स, बनावट अर्ज फॉर्म्स आणि दिशाभूल करणारी माहिती दिली जाते. अनेकदा अशा स्कीम्समधून लोकांकडून वैयक्तिक माहिती, ओटीपी किंवा पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातो.
सरकारकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे ‘मोफत शिलाई मशीन योजना 2025’ ही योजना फसवणूक असून पूर्णपणे बनावट आहे.
जर तुम्हालाही अशा कोणत्याही सोशल मीडिया पोस्ट्स किंवा वेबसाइट्सवरून अर्ज करण्यास सांगितल जात असेल, तर सावध राहा. कुठलीही माहिती शेअर करण्याआधी संबंधित खात्याच्या अधिकृत वेबसाइटवर तपासणी करा.
🔴 हेही वाचा 👉 सरकारी नोकरीची संधी – सेंट्रल बँकेत परीक्षा न देता थेट भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जून.