Ladki Bahin Yojana News: लाडकी बहिण योजनेसाठी इतर योजनांचा बळी? बनली ‘सरकारसाठी डोकेदुखी’

2 Min Read
Ladki Bahin Yojana Funding Shifted From Other Departments

Ladki Bahin Yojana Latest News : महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान गेम चेंजर ठरलेली ही योजना आता सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे, अस विरोधकांच म्हणण आहे. कारण या योजनेसाठी इतर महत्त्वाच्या विभागांचा निधी वळवण्यात येत असल्याच समोर आल आहे.

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, आदिवासी विकास विभागाचा तब्बल 335 कोटी रुपये निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. याआधीही सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवण्यात आला होता. यामुळे सरकारवर टीका सुरू झाली असून, अनेक ईतर सरकारी योजनांवर त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसून येत आहे.

गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजना, आनंदाचा शिधा योजना आणि शिवभोजन थाळी यासारख्या योजनांना देखील याचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत अद्याप मिळालेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. कृषी विभागाने 60 कोटींचा प्रस्ताव पाठवला असला तरी त्यासाठी अद्याप निधी मंजूर झालेला नाही.

या सगळ्याबाबत प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निधी वळवण्याच्या घटनेला एक प्रकारे मान्यता दिली. तर आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी विभागाला निधी कमी पडू देणार नसल्याच सांगितल.

विरोधकांचा आरोप आहे की, लाडकी बहिण योजना आता ‘सरकारसाठी डोकेदुखी’ ठरत आहे. निवडणुकीत फायदेशीर ठरलेली योजना आता इतर योजनांचे नुकसान करत आहे का, हा प्रश्न उभा राहिला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारमध्ये अंतर्गत नाराजीचे सूर उमटू लागले असल्याच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यामुळे भविष्यात लाडकी बहीण योजना सरकारसाठी आव्हान बनू शकते.

🔴 हेही वाचा 👉 देशात जून 2025 मध्ये बँकांना 13 दिवस सुट्ट्या! बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी.

Share This Article