Post Office RD Scheme : महागाईच्या काळात सुरक्षित आणि स्थिर परतावा मिळवण प्रत्येक गुंतवणूकदाराच स्वप्न असत. अशातच पोस्ट ऑफिसची एक योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ज्यात दरमहा फक्त ₹1500 ची बचत करून काही वर्षांत लखपती बनता येते. ती आहे पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना.
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना सरकारच्या लघु बचत योजनांपैकी एक असून ती वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येते. यामध्ये दरमहा नियमित गुंतवणूक करून मुदतीनंतर एक ठराविक परतावा मिळतो. सध्या या योजनेवर 6.7% वार्षिक व्याज दर आहे, जो तिमाही चक्रवाढ स्वरूपात दिला जातो.
कशी करता येते सुरुवात?
रिकरिंग डिपॉझिट योजनेत सुरुवात फक्त ₹100 पासून करता येते. जर ₹1500 मासिक गुंतवणुकीचा विचार केल्यास, ५ वर्षांमध्ये तुमचे दरमहा ₹1500 प्रमाणे एकूण ₹90,000 जमा होतील. या कालावधीत मिळणाऱ्या व्याजासह अंतिम रक्कम होईल अंदाजे ₹1,07,050. म्हणजेच, ५ वर्षांमध्ये तुमच्या दर महिन्याला गुंतवलेल्या 1500 रुपयांच्या गुंतवणूकतून तुम्हाला व्याजासह एकूण ₹1,07,050 परतावा मिळेल.
१० वर्षांच्या गुंतवणूकीवर…?
जर तुम्ही हीच गुंतवणूक पुढील ५ वर्षांसाठी वाढवली (म्हणजे एकूण १० वर्षे) केली तर तुमचे एकूण ₹1,80,000 जमा होतील आणि त्यावर मिळणारे व्याज जवळपास ₹76,283 इतके होऊन, तुम्हाला ₹2,56,283 परतावा मिळू शकतो.
ही योजना कोणासाठी योग्य?
नियमित बचत करणारे मध्यमवर्गीय
कमी जोखमीचा पर्याय शोधणारे
वृद्ध किंवा गृहिणी ज्या दीर्घकालीन आणि स्थिर गुंतवणूक शोधत आहेत
🔴 हेही वाचा 👉 आता बँक बुडाली तर खातेदारांना मिळणार ‘इतके’ लाख रुपये? RBI महत्त्वपूर्ण निर्णयाच्या तयारीत!.