8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाची तयारी सुरू? सुमारे 1 कोटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

2 Min Read
8th Pay Commission Salary Hike News

8th Pay Commission Salary Hike News : केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या तयारीला गती मिळाल्याची शक्यता असून, देशभरातील सुमारे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तिवेतनधारकांना याचा थेट लाभ मिळू शकतो. सरकारी सूत्रांनुसार, हा नवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी 8व्या वेतन आयोगासंदर्भात मंजुरी दिली होती. मात्र अद्याप आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती झालेली नाही. तरीही आता टर्म्स ऑफ रेफरन्स (ToR) लवकरच मंत्रिमंडळात मंजूर होण्याची शक्यता आहे. एकदा हे टर्म्स मंजूर झाले की, आयोग वेतन, भत्ते आणि निवृत्तिवेतन धोरणात आवश्यक बदलांसाठी आपली शिफारस केंद्र सरकारकडे सादर करेल.

किती होणार पगारवाढ?

वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, फिटमेंट फॅक्टर 1.92 ते 2.86 दरम्यान असू शकतो. त्यामुळे सध्याचा ₹18,000 रुपयांचा किमान पगार वाढून ₹51,480 पर्यंत होऊ शकतो. अर्थात, हा आकडा अद्याप औपचारिक नाही. सरकारकडून यावर अद्याप अंतिम घोषणा करण्यात आलेली नाही.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या मूळ पगारावर आधारित एक गुणक, जो नव्या वेतन रचनेनुसार लागू केला जातो. उदा., 7व्या वेतन आयोगात हा गुणक 2.57 होता, ज्यामुळे सुमारे 14% पगारवाढ झाली होती.

कुणाला होणार लाभ?

या वेतन आयोगाचा फायदा केंद्रीय कर्मचारी, संरक्षण सेवांतील कर्मचारी तसेच केंद्र सरकारच्या विविध खात्यांतील निवृत्तिवेतनधारकांना मिळणार आहे. आयोग महागाई भत्त्यातील सुधारणा, निवृत्तिवेतनाची पुनर्रचना तसेच बोनस आणि इतर भत्त्यांबाबत शिफारशी करेल.

सरकारचा पुढील निर्णय महत्त्वाचा

वेतन आयोग दर 10 वर्षांनी स्थापन केला जातो. सध्या देशात 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन दिल जात, जो 1 जानेवारी 2016 पासून लागू आहे. आता कर्मचारी आणि पेंशनधारक सरकारच्या पुढील अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत.

🔴 हेही वाचा 👉 निराधार, विधवा महिला व वृद्धांना मिळणार दरमहा 2000 रुपये; कोण कोण पात्र आहेत? जाणून घ्या.

Share This Article