Aadhaar कार्डवरील फोटो बदलायचाय? ही सोपी पद्धत वापरा आणि लावा चिकना फोटो!

2 Min Read
Aadhaar Card Photo Change Online Offline Process UIDAI

Aadhaar Card Photo Change Online Offline Process UIDAI : आपल्यापैकी अनेकांना आधार कार्डवरील फोटोबद्दल नाराजी असते. कधी फोटो धुसर येतो, कधी काळवंडलेला तर कधी तो पाहून स्वतःची ओळखच पटत नाही. पण आता चिंता करण्याची गरज नाही. आता UIDAI ने फोटो अपडेट करण्याची प्रक्रिया अगदी सोपी केली आहे. आता तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील फोटो सहज बदलू शकता.

आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी काय कराव लागेल?

  1. UIDAI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या – uidai.gov.in वर जाऊन “Enrolment/Update Form” डाउनलोड करा.
  2. फॉर्म भरा आणि प्रिंट घ्या – आवश्यक माहिती भरून तो फॉर्म प्रिंट करून घ्या.
  3. जवळच्या आधार केंद्रावर जा – आधार केंद्राचा पत्ता वेबसाईटवरून शोधता येतो. ऑनलाइन अपॉइंटमेंटही बुक करता येते.
  4. फोटो आणि बायोमेट्रिक अपडेट – आधार केंद्रात तुमचा नवीन फोटो घेतला जाईल. तुमचे फिंगरप्रिंट प्रमाणित केले जाईल.
  5. अपडेट स्टेटस ट्रॅक करा – सेवा क्रमांक (Service Request Number) मिळाल्यानंतर UIDAI च्या वेबसाईटवरून तुम्ही अपडेटचा स्टेटस पाहू शकता.

किती खर्च येतो?

आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी ₹100 शुल्क आकारले जाते.
जर तुम्हाला नवीन प्लास्टिक आधार कार्ड हवे असेल, तर त्यासाठी तुम्हाला ₹50 अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.

अपडेट व्हायला किती वेळ लागतो?

फोटो अपडेट प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणतः 7 ते 90 दिवसांचा कालावधी लागू शकतो. यानंतर तुम्ही तुमच नवीन ई-आधार डाउनलोड करू शकता.

लक्षात ठेवा!

Aadhaar कार्डवरील फोटो अपडेट करताना तुमचा नवीन फोटो व्यवस्थित दिसतोय का हे आधार केंद्रातच तपासा. बायोमेट्रिक तपासणी अनिवार्य असल्यामुळे आधार केंद्रावर स्वतः हजर राहणे गरजेचे आहे. तुमच्याकडे ओळखपञांची झेरॉक्स प्रत आणि मूळ प्रत दोन्ही असाव्यात.

🔴 हेही वाचा 👉 8व्या वेतन आयोगाची तयारी सुरू? सुमारे 1 कोटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा.

Share This Article