Ayushman Vay Vandana Card 2025 Application Process Benefits : 70 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची आरोग्य योजना आणली आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली “आयुष्मान वय वंदना योजना” ही 70 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य सुरक्षेचा एक चांगला आधार ठरत आहे. आयुष्मान वय वंदना कार्डच्या माध्यमातून लाभार्थ्यांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात आणि ही सुविधा भारतातील अनेक सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.
आयुष्मान वय वंदना योजनेचा उद्देश वयोवृद्ध नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा देणे हा आहे. विशेष म्हणजे आता या कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून, इच्छुक नागरिक थेट मोबाईल अॅप किंवा अधिकृत वेबसाइटवरून हे कार्ड मिळवू शकतात. अर्ज करताना आधार कार्ड आणि आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत कोणत्याही आर्थिक स्तरातील नागरिक अर्ज करू शकतात, फक्त त्यांच वय 70 वर्षे किंवा त्याहून अधिक असण आवश्यक आहे.
मोबाईलवरून अर्ज करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून ‘आयुष्मान अॅप’ डाउनलोड कराव लागत. त्यानंतर लॉगिन करून ’70+ वर्षासाठी नावनोंदणी’ हा पर्याय निवडावा लागतो. आधार क्रमांक, ई-केवायसी प्रक्रिया, आवश्यक माहिती आणि फोटो अपलोड करून अर्ज सादर करता येतो. हीच पद्धत अधिकृत वेबसाइटवरही लागू आहे. अर्ज सादर केल्यानंतर काही मिनिटांत कार्ड डाउनलोडसाठी उपलब्ध होत.
सरकारी आकडेवारीनुसार 25 मे 2025 पर्यंत देशभरातून जवळपास 66 लाख अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 65 लाखांहून अधिक अर्ज मंजूर झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक अर्ज मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, केरळ आणि गुजरातमधून प्राप्त झाले आहेत. या कार्डामुळे वृद्ध नागरिकांना केवळ मोफत उपचारच मिळत नाहीत तर त्यांचा आर्थिक भारही हलका होतो.
आयुष्मान भारत योजना ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना मानली जाते. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही योजना सुरू करण्यात आली होती. तिच्या विस्ताराअंतर्गत आता 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना या योजनेचा थेट लाभ मिळतो.
या योजनेबाबत अधिक माहितीसाठी आणि मदतीसाठी सरकारने 14555 आणि 1800-11-0770 हे टोल-फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिले आहेत. या हेल्पलाइनवर २४ तास संपर्क करता येतो. जर तुमच्या घरात 70 वर्षांहून अधिक वयाचे आजी-आजोबा, आई-वडील असतील, तर त्यांच्यासाठी या योजनेसाठी नक्कीच अर्ज करा.
🔴 हेही वाचा 👉 मुली व महिलांसाठी खास योजना! दोन वर्षांत बना लखपती.