Gotha Bandhkam Anudan Yojana Apply Maharashtra 2025 : दुधाळ जनावरे असलेल्या शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘गाय गोठा बांधकाम अनुदान योजना’ या योजनेअंतर्गत गोठा बांधण्यासाठी रु. ७७,१८८ पर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे. शासनाच्या वतीने या योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोठा बांधकाम योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत प्रस्ताव सादर करावा लागतो. हा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवण्यात येतो व नंतर जिल्हा परिषदेकडून मंजूरी दिली जाते.
ही योजना ‘शरद पवार ग्राम समृद्धी योजने’च्या रोजगार हमी योजनेतून राबवण्यात येते. शेतकरी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घेत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Gotha Yojana आवश्यक कागदपत्रे:
पशुपालकाचे आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी प्रमाणपत्र
बँक पासबुक (खात्याची माहिती)
ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र
गोठा बांधकामासाठीचा प्रस्ताव व अंदाजपत्रक (Estimate)
या कागदपत्रांसह 2021 च्या शासन निर्णयाचा (GR) उल्लेख करून प्रस्ताव सादर करावा लागतो. हे सर्व नमुने व दस्तावेज शेतकऱ्यांच्या सुलभतेसाठी आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहेत.
गोठा का महत्त्वाचा?
दुग्धव्यवसाय करत असताना गोठा नसेल तर दुधाळ जनावरांना आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे दुग्ध उत्पादनावर परिणाम होतो आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. गोठा हे दुग्धव्यवसायात आवश्यक व संरक्षक पाऊल आहे.
🔴 हेही वाचा 👉 “लाडकी बहिण” योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही – चंद्रशेखर बावनकुळे.