Bank Holidays: देशात जून 2025 मध्ये बँकांना 13 दिवस सुट्ट्या! बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

2 Min Read
List of Bank Holidays in June 2025 (Representative Image)

Bank Holidays June 2025 List : जर तुम्ही जून महिन्यात बँकेत कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर आधी हे जाणून घ्या की जून महिन्यात बँका कधी कधी बंद राहणार आहेत. जून 2025 मध्ये देशभरात एकूण 13 दिवस बँकांना सुट्टी आहे. यामध्ये आठवड्याचे रविवार, दुसरे आणि चौथे शनिवार तसेच विविध सण व विशेष दिवसांचा समावेश आहे.

बँक सुट्ट्यांची यादी (Bank Holidays in June 2025):

1 जून (रविवार) – देशात सर्वत्र बँका बंद
6 जून (शुक्रवार) – ईद उल अधामुळे तिरुवनंतपुरम व कोच्ची येथे बँका बंद
7 जून (शनिवार) – बकरीदमुळे अनेक राज्यांत (उदा. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता) बँका बंद
8 जून (रविवार) – देशात सर्वत्र बँका बंद
10 जून (मंगळवार) – श्री गुरु अर्जुन देव जी शहीदी दिवस, पंजाबमध्ये बँका बंद
11 जून (बुधवार) – संत कबीर जयंती, गंगटोक व शिमला येथे बँका बंद
14 जून (शनिवार) – दुसरा शनिवार, सर्वत्र बँका बंद
15 जून (रविवार) – देशात सर्वत्र बँका बंद
22 जून (रविवार) – देशात सर्वत्र बँका बंद
27 जून (शुक्रवार) – रथयात्रा*मुळे इंफाल व भुवनेश्वर येथे बँका बंद
28 जून (शनिवार) – चौथा शनिवार, संपूर्ण भारतात बँका बंद
29 जून (रविवार) – सर्वत्र बँका बंद
30 जून (सोमवार) – रेम्रा नी निमित्त, आयझोल येथे बँका बंद

बँकेशी संबंधित व्यवहार उदा. कॅश डिपॉझिट, चेक क्लिअरिंग, लोन संबंधित कामे आधीच उरकून घ्या. सुट्टीच्या दिवशी बँका बंद असल्यामुळे व्यवहारांमध्ये अडथळे येऊ शकतात.

टीप: डिजिटल बँकिंग सेवा (UPI, नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग) सुट्ट्यांमध्येही कार्यरत राहतात.

🔴 हेही वाचा 👉 ₹10 आणि ₹20 च्या नोटा व नाणी बंद? अर्थ मंत्रालयाचा लोकसभेत मोठा खुलासा.

Share This Article