Ration Card 1000 Rupees Scheme 2025 : महाराष्ट्र सरकारकडून गरिबांसाठी आणखी एक महत्त्वाची योजना जाहीर करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत रेशन कार्डधारक कुटुंबांना मोफत धान्याबरोबरच आता दरमहा १,००० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना १ जून २०२५ पासून अंमलात येणार असून याचा फायदा राज्यातील लाखो गरजू कुटुंबांना होणार आहे.
या योजनेचा उद्देश काय आहे?
सरकारकडून या योजनेद्वारे केवळ मोफत अन्नधान्यपुरवठा न करता, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात देण्याचा उद्देश आहे. विशेषतः ज्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
काय असतील अर्जासाठीचे पात्रता निकष?
रेशन कार्ड असणे अनिवार्य
आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक
अर्जदाराने शासनाने ठरवलेले सर्व निकष पूर्ण केले पाहिजेत
अर्ज प्रक्रिया कशी असेल?
- आपल्या राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- ‘रेशन कार्ड नवीन योजना २०२५’ या पर्यायावर क्लिक करा.
- आपला रेशन कार्ड क्रमांक व इतर तपशील भरा, तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज भरून झाल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
नोंद: सदर अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असेल. अर्ज करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही.
🔴 हेही वाचा 👉 राज्यात त्रिभाषा सूत्राची सक्ती: सर्व केंद्र व राज्य शासकीय कार्यालयांसाठी नियम लागू.