UPI New Rules In Marathi : UPI वापरकर्त्यांसाठी एक महत्वाचा बदल लवकरच लागू होणार आहे. ३१ जुलै २०२५ पासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून बॅलन्स चेक, ट्रान्झॅक्शन स्टेटस आणि ऑटोपे या सेवा वापरण्यावर मर्यादा लागू केली जाणार आहे. सततच्या API कॉलमुळे UPI नेटवर्कवर येणारा ताण रोखण्यासाठी NPCI ने हे पाऊल उचलले आहे.
नवीन नियमानुसार, वापरकर्ते एका दिवसात ५० वेळांपेक्षा अधिक वेळा बॅलन्स चेक करू शकणार नाहीत. हा नियम खासकरून Paytm, PhonePe, Google Pay सारख्या UPI अॅप्सवर लागू असेल. याशिवाय, ट्रान्झॅक्शन स्टेटस फक्त २ तासात ३ वेळा तपासता येईल.
‘पीक अवर्स’मध्ये सेवा मर्यादित
NPCI ने काही वेळा ‘पीक अवर्स’ म्हणून घोषित केले आहेत – सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९:३० या वेळेत UPI नेटवर्कवर ताण वाढतो. त्यामुळे या वेळेत बॅकएंडमधून होणारे अनेक API रिक्वेस्ट्स (जसे की ऑटो अपडेट्स) मर्यादित केले जातील.
ऑटोपे फक्त ‘नॉन-पीक टाइम’ मध्ये
Netflix, SIP यांसारख्या सेवांसाठी वापरला जाणाऱ्या UPI ऑटोपेची यापुढे केवळ नॉन-पीक वेळातच प्रक्रिया केली जाईल. एका मँडेटसाठी फक्त एकदाच प्रयत्न होईल आणि तो सुद्धा मर्यादित वेळीच.
नवीन नियमामुळे काय होणार?
NPCI च्या म्हणण्यानुसार, हे नियम जरी व्यापारी व मोठे व्यवहार करणाऱ्यांसाठी अडचणीचे वाटत असले तरी यामुळे नेटवर्कची स्थिरता टिकून राहील आणि सामान्य वापरकर्त्यांसाठी सेवा अखंडितपणे सुरु राहील. बँकांना आता प्रत्येक व्यवहारानंतर ग्राहकांना बॅलन्स माहिती पाठवावी लागणार आहे, जेणेकरून ग्राहक वारंवार बॅलन्स तपासत राहणार नाहीत.
🔴 हेही वाचा 👉 मुसळधार पावसाचा कहर! शेती, पिके, पशुधन व घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश.