ई-केवायसीच्या नावाखाली फसवणुकीपासून सावधान! सर्व रेशन कार्डधारकांनी ही माहिती जरूर वाचा Ration Card E Kyc Fraud Alert

2 Min Read
Ration Card E Kyc Fraud Alert How To Stay Safe (प्रतिकात्मक फोटो)

मुंबई | २६ मे २०२५ : Ration Card E Kyc Fraud Alert How To Stay Safe – तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली आहे हे तर तुम्हाला माहित असेलच. पण आता या प्रक्रियेमुळे काही फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. अशा फसवणुकीपासून सावध राहणे आता अत्यावश्यक आहे.

रेशन कार्ड ई-केवायसी का गरजेची?

अनेक लाभार्थी बनावट रेशन कार्डचा वापर करून लाभ घेत आहेत, अनेक ठिकाणी असे निदर्शनास आले आहे की, मृत व्यक्तीच्या नावावर अजूनही रेशन घेतले जात आहे, तर काहींनी रेशन कार्ड असूनही ते वापरलेलेच नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांची खरी ओळख पटवण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे.

फसवणुकीचे प्रकार कसे होतात?

सायबर गुन्हेगारांकडून बनावट लिंक पाठवल्या जातात, ज्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडून वैयक्तिक माहिती मागवली जाते. काही वेळा फोन करून सांगितले जाते जाते की आज जर ई-केवायसी पूर्ण केली नाही तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे. आणि अशा पद्धतीने नागरिकांकडून आधार कार्ड, बँक डिटेल्स, ओटीपी किंवा इतर माहिती घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते.

खरी ई-केवायसी प्रक्रिया काय आहे?

  1. तुमच्या जवळच्या रेशन डीलरकडे जा.
  2. तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड दाखवा.
  3. पॉस मशीनमध्ये बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट) तपासणी होते.
  4. रेशन कार्डावरील सर्व सदस्यांनी स्वतः हजर रहावे लागते.
  5. ही संपूर्ण प्रक्रिया मोफत असते.

पैसे मागितल्यास तक्रार करा

ई-केवायसीसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. जर डीलर पैसे मागत असेल, तर त्याची अधिकृत तक्रार करता येते. सरकारने ही सेवा पूर्णपणे निशुल्क केली आहे.

निष्कर्ष

सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, तर योग्य मार्गाने केवायसी करणे गरजेचे आहे. फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका.

🔴 हेही वाचा 👉 Aadhaar कार्डवरील फोटो बदलायचाय? ही सोपी पद्धत वापरा आणि लावा चिकना फोटो.

Share This Article