8th Pay Commission: मोठी अपडेट; पगार रचना पूर्णपणे बदलणार! मर्जिंगमुळे मुळ पगारात प्रचंड मोठी वाढ अपेक्षित

2 Min Read
8th Pay Commission Salary Structure Merge Update

8th Pay Commission Salary Structure Merge Update : सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून 8वा वेतन आयोग (8th Pay Commission) 1 जानेवारी 2026 पासून लागू केला जाण्याची शक्यता आहे, आणि त्याअंतर्गत सध्याच्या पगारात खूप मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे, वेतन आयोगाकडून Level 1 ते Level 6 या वेतन स्तरांना एकत्र करून तीन नवीन वेतन स्तर (A, B, C) तयार करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या नव्या वेतन रचनेनुसार कर्मचाऱ्यांचा मुळ पगार आणि प्रमोशन दोन्ही अधिक वेगाने वाढतील, असा अंदाज आहे.

8th Pay Commission | काय असेल बदल?

Level A: Level 1 आणि 2 मर्ज होणार
Level B: Level 3 आणि 4 मर्ज होणार
Level C: Level 5 आणि 6 मर्ज होणार

हे मर्जिंग झाल्यास मुळ पगारात प्रचंड मोठी वाढ अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, सध्या ₹18,000 असलेला मुळ पगार ₹34,000 पर्यंत वाढू शकतो.

कोणाला मिळणार सर्वाधिक फायदा?

Level 1, 3 आणि 5 वर कार्यरत कर्मचाऱ्यांना याचा थेट लाभ होणार असून त्यांच्या पगारात झपाट्याने वाढ होईल. त्याच वेळी, अन्य स्तरांवरील कर्मचाऱ्यांनाही प्रमोशनच्या संधी अधिक वेगाने मिळतील. ही रचना पगारातील असमानता दूर करून वेतन पद्धती अधिक पारदर्शक आणि सुसंगत बनवेल.

यातील अडचणी काय?

वेतन वाढीचा वित्तीय भार, वरिष्ठतेची पुनर्निर्धारण प्रक्रिया, आणि नवीन जबाबदाऱ्यांच वाटप यासारख्या अडचणी सरकारसमोर आहेत. मात्र, केंद्र सरकार आणि वेतन आयोग या मुद्द्यांवर सखोल विचार करत असून अंतिम शिफारसी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 सरकारच्या या योजनेतून नवरा-बायकोला मिळणार दरमहा 9,250 रुपये पेन्शन! जाणून घ्या सविस्तर माहिती.

Share This Article